Thursday, September 04, 2025 07:00:32 PM

गोड्या पाण्यातील मासेमारीला नवा वाव

राज्यात गोड्या पाण्यातील मासेमारीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 गोड्या पाण्यातील मासेमारीला नवा वाव

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मासेमारीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेताना ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील गोड्या पाण्यातील मासेमारी वाढविण्याच्या दृष्टीने एक ठोस धोरण तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, मत्स्यबीज (फिशिंग हॅचरी) उपलब्धतेसाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत, कारण यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारीला गती मिळू शकते. मत्स्य व्यवसायाच्या वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, ज्या ठिकाणी चांगला मत्स्यबीज उत्पादन केला जातो, तिथे त्या संस्थांना प्रोत्साहन व आर्थिक मदत दिली जावी. सागरी आणि गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे, त्यानुसार राज्य सरकारने मत्स्यव्यवसायिकांना लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी. असे फडणवीस म्हणले. 

बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे आणि इतर उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते दरम्यान, मत्स्य व्यवसायाच्या वाढीसाठी विविध नवीन सुविधा उभारण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे.

हेही वाचा 👇🏻 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण


सम्बन्धित सामग्री