Friday, September 19, 2025 09:38:50 AM

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना अदिती तटकरेंचं आवाहन; ही प्रक्रिया पुढील 2 महिन्यात करा, अन्यथा लाभ मिळणं...

राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता यावी, याकरता राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थींना आवाहन केलं आहे.

ladki bahin yojana  लाडक्या बहिणींना अदिती तटकरेंचं आवाहन ही प्रक्रिया पुढील 2 महिन्यात करा अन्यथा लाभ मिळणं

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता यावी, याकरता राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थींना आवाहन केलं आहे. त्यांनी योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. यानुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनीं e-KYC प्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in ही वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा : Today's Horoscope 2025: आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला, जाणून घ्या...

योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अशी नम्र विनंती अदिती तटकरे यांनी केली आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी. मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीटरवर पोस्ट करत लाडकी बहिण योजनेसंदर्भाती महत्वाची अपडेट दिली आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी e-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याबाबत शासन निर्णयाचे परिपत्र देखील जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, दोन महिन्यात e-KYC न केल्यास पुढील होणाऱ्या कारवाईस ते जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी अशी माहिती देखील परिपत्रकात देण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री