Friday, September 19, 2025 11:12:02 AM

Apple iPhone 17 Launch : ॲपल आयफोन 17 खरेदीसाठी मुंबई, दिल्लीसह विविध शहरात स्टोअर्सबाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी

ॲपलच्या बहुप्रतीक्षित आयफोन 17 सिरीजची विक्री आजपासून भारतात सुरू झाली असून तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे.

apple iphone 17 launch  ॲपल आयफोन 17 खरेदीसाठी मुंबई दिल्लीसह विविध शहरात स्टोअर्सबाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी

मुंबई : ॲपलच्या बहुप्रतीक्षित आयफोन 17 सिरीजची विक्री आजपासून भारतात सुरू झाली असून तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि दिल्लीच्या साकेत येथील ॲपल स्टोअर्सबाहेर सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्या. काही ग्राहकांनी तर नवीन आयफोन मिळवण्यासाठी रात्रीपासूनच स्टोअरबाहेर थांबण्याचा पर्याय निवडला.

नवीन मालिकेत आयफोन 17, आयफोन एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स अशी चार मॉडेल्स उपलब्ध झाली आहेत. मागील सिरीजच्या तुलनेत या वेळी कंपनीने बेस व्हेरिएंट थेट 256GB स्टोरेजसह उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे किंमत थोडी जास्त असली तरी ग्राहकांना अधिक स्टोरेजची सुविधा मिळते.

हेही वाचा : US On Gaza Ceasefire : गाझा युद्धबंदी ठरावाला अमेरिकेचा सहाव्यांदा व्हेटो; पॅलेस्टिनी जनतेवर संकट कायम

भारतातील आयफोन 17 सिरीजचे दर

आयफोन 17

256GB – Rs.82,900

512GB – Rs.1,02,900

आयफोन एअर

256GB – Rs.1,19,900

512GB – Rs.1,39,900

1TB – Rs.1,59,900

आयफोन 17 प्रो

256GB – Rs.1,34,900

512GB – Rs.1,54,900

1TB – Rs.1,74,900

आयफोन 17 प्रो मॅक्स

256GB – Rs.1,49,900

512GB – Rs.1,69,900

1TB – Rs.1,89,900

2TB – Rs.2,29,900

या किंमतींमुळे आयफोन 17 सिरीज प्रीमियम श्रेणीत मोडते, मात्र नव्या फिचर्स, दमदार प्रोसेसर आणि सुधारित कॅमेरा सिस्टीममुळे ग्राहकांचा ओढा आयफोन 17 च्या सिरीजकडे स्पष्टपणे दिसत आहे.


सम्बन्धित सामग्री