BMW Crash Near Dhaula Kuan: दिल्लीतील धौला कुआं परिसरात बीएमडब्ल्यूच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्याचा मुलगा नवनूर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, जर माझ्या वडिलांना अपघातस्थळाजवळील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात नेले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते. त्याऐवजी त्यांना 20 किमी दूर जीटीबी नगर येथील न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे आवश्यक सुविधा नव्हत्या.
नवनूर सिंग यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, हा अपघात दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडला. बीएमडब्ल्यू चालवणाऱ्या एका मुलीने माझ्या पालकांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यांना दूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र धौला कुआं आणि एम्स परिसरात अनेक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, जिथे वेळेवर उपचार मिळाले असते तर ते वाचले असते. त्यांनी पुढे आरोप केला की, जीटीबी नगरमधील न्यू लाईफ हॉस्पिटल हे बीएमडब्ल्यू चालवणाऱ्या मुलीचेच आहे आणि तिच्या पतीला देखील तिथेच दाखल करण्यात आला होते. माझ्या पालकांना डिलिव्हरी व्हॅनमध्ये रुग्णालयात पाठवण्यात आले. माझी आई शुद्धीवर आल्यावर तिने पाहिले की माझे वडील मागे पडलेले होते.
हेही वाचा - Government Medicines Near Home : आता घराच्या जवळच मिळतील स्वस्त सरकारी औषधे; 2 वर्षांत उघडणार हजारो जनऔषधी केंद्रे
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, अपघातात सामील बीएमडब्ल्यू गुरुग्राममधील एका महिलेने चालवली होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारमध्ये ती तिच्या पतीसह होती. धडकेनंतर त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी टॅक्सीची मदत केली. मात्र, डॉक्टरांनी सिंग यांना मृत घोषित केले.
हेही वाचा - Donald Trump : '...तर त्यांच्यापेक्षाही चांगले काम करतील'; डोनाल्ड ट्रम्प यांचे परदेशी कंपन्यांना अमेरिकन कामगारांना प्रशिक्षण देण्याचे आवाहन
दरम्यान, आरोपी दाम्पत्यालाही दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात सामील वाहने जप्त करण्यात आली आहेत. फॉरेन्सिक आणि गुन्हे अन्वेषण पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.