नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं सोमवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. सिद्धार्थ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयात असतानाच चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते नातू होत.
हेही वाचा : Today's Horoscope 2025: तुमच्या राशीच्या आधारावर आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या शुभ आणि अशुभ संकेत
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची उत्तम जाण असणारे तसेच सखोल संविधानिक ज्ञान असणारे वकील अशी त्यांची ओळख होती. सिद्धार्थ शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. सोमवारी ते नेहमीप्रमाणे न्यायालयात गेले होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आल्यानंतर एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ शिंदे यांचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक आहे.