Tuesday, September 16, 2025 01:03:51 PM

UPI Transaction Limit: डिजिटल व्यवहार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आता UPI द्वारे दररोज 10 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार

आता दररोज 10 लाख रुपये पर्यंतचे व्यवहार करू शकतील. ही सुविधा आजपासून लागू झाली असून ती सुरुवातीला फक्त निवडक श्रेणींमध्ये आणि सत्यापित व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध असेल.

upi transaction limit डिजिटल व्यवहार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आता upi द्वारे दररोज 10 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार

UPI Transaction Limit: डिजिटल व्यवहार करणाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहाराची मर्यादा वाढवली आहे. यामुळे वापरकर्ते आता दररोज 10 लाख रुपये पर्यंतचे व्यवहार करू शकतील. ही सुविधा आजपासून लागू झाली असून ती सुरुवातीला फक्त निवडक श्रेणींमध्ये आणि सत्यापित व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध असेल.

NPCI च्या परिपत्रकानुसार - 

व्यक्ती-ते-व्यापारी (P2M) व्यवहारांची मर्यादा 5 लाख रुपये प्रति व्यवहार करण्यात आली आहे. एकूण दैनिक मर्यादा 10 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा बदल विमा प्रीमियम, भांडवली बाजार, प्रवास, संकलन, आणि सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) सारख्या क्षेत्रांवर लागू असेल.

हेही वाचा - Google Gemini: ChatGPT ला टक्कर! Google Gemini AI ने दोन आठवड्यात कसे बदलले Play Store चे समीकरण?

पूर्वी विमा आणि भांडवली बाजार गुंतवणुकीसाठी प्रति व्यवहार मर्यादा 2 लाख रुपये होती, जी आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारी ई-मार्केटप्लेसवरील कर भरणा आणि अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) सेवांसाठीची मर्यादा 1 लाख रुपये वरून 5 लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा UPI Safety Tips: UPI वापरताना 'या' 5 चुका टाळा, नाहीतर बँक अकाउंट होऊ शकते रिक्त

याशिवाय क्रेडिट कार्ड बिल पेमेंट्स UPI द्वारे 5 लाख रुपये पर्यंत करता येतील. मात्र क्रेडिट कार्डसाठी दैनिक मर्यादा 6 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) व्यवहाराची मर्यादा मात्र अजूनही 1 लाख रुपये वर कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे डिजिटल पेमेंट आणखी सोपे, सुरक्षित आणि वेगवान होईल. उच्च मूल्याच्या व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल आणि भारताची डिजिटल अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल.


सम्बन्धित सामग्री