Tuesday, September 16, 2025 02:39:27 PM

Mumbai Local Molestation Case: दादर रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग; 62 वर्षीय आरोपीला अटक

दादर रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळी एका 62 वर्षीय वृद्धाने महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती.

mumbai local molestation case दादर रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग 62 वर्षीय आरोपीला अटक

Mumbai Local Molestation Case: मुंबईत पुन्हा एकदा लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. दादर रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळी एका 62 वर्षीय वृद्धाने महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपीचे नाव दर्शन कुमार माखन असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. दादर रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली, मात्र त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

हेही वाचा - Nashik School Bomb Threat: नाशिकमधील शाळेला बॉम्बची धमकी; पोलीस आणि बॉम्ब पथकाकडून शोधमोहीम सुरू

ही घटना शनिवारी दुपारी 12:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते दादर दरम्यान धावणाऱ्या जलद लोकलमध्ये घडली. तक्रारदार महिला तिच्या मैत्रिणीसोबत प्रवास करत असताना गर्दीच्या डब्यात आरोपीने तिच्या कंबरेला अयोग्य स्पर्श केला. या प्रकाराने महिला घाबरली आणि तिने ताबडतोब याबाबत मैत्रिणीला माहिती दिली.

हेही वाचा - Uttar Pradesh Crime : 'माझा जीव वाचला', म्हणत नवऱ्यानेच लावून दिलं बायकोचं दुसरं लग्न पण..., नेमकं झालं काय ?

ट्रेन दादर स्थानकावर पोहोचताच महिलेनं प्लॅटफॉर्मवरील पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक करून चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. तक्रारीच्या आधारे दर्शन कुमार माखनविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि, पुढील चौकशीदरम्यान त्याला जामिनावर सोडण्यात आले. या घटनेमुळे लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवासी महिलांनी पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची मागणी केली आहे.


सम्बन्धित सामग्री