चीन: 15 फेब्रुवारी 2025 रोजी चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियशिपमध्ये तामिळनाडूमधील आनंदकुमार वेलकुमारने वरिष्ठ पुरुषांच्या 1000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताचे पहिले सुर्वणपदक जिंकले. चेन्नईतील गिंडी येथील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय आनंदकुमार वेलकुमारने 1: 24. 924 सेकंदाच्या वेळेसह चॅम्पियशिपमध्ये भारताचे पहिले सुर्वणपदक जिंकले आणि स्पीड स्केटिंग रेसमध्ये तो पहिला भारतीय विश्वविजेताही बनला.
चीनमधील बेदाईहे येथे झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियशिपमध्ये 500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आनंदकुमार वेलकुमारने 43.072 सेकंद वेळ नोंदवून भारताचे पहिले वरिष्ठ जागतिक पदक जिंकले होते. या स्पर्धेत आनंदकुमार वेलकुमारने 500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा विजय मिळाला. विशेष म्हणजे, 22 वर्षीय आनंदकुमार वेलकुमार हा स्पीड स्केटिंग स्पर्धेत पहिला भारतीय वर्ल्ड चॅम्पियनही बनला. त्यामुळे, अनेकजण त्याच्या कार्यकिर्दीचे कौतुक करत आहेत.
हेही वाचा: ITR filing 2025 Date Extended : आयटीआर दाखल करण्यासाठी अखेर मुदतवाढ; करदात्यांना या तारखेपर्यंत दिलासा
पंत्रप्रधान नरेंद्र मोदींनी X वर पोस्ट करून 22 वर्षीय आनंदकुमार वेलकुमारचे कौतुक केले. मोदी म्हणाले की, '2025 च्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियशिपमध्ये वरिष्ठ पुरुषांच्या 1000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुर्वणपदक जिंकल्यामुळे, आनंदकुमार वेलकुमारचा अभिमान आहे. जिद्द, चिकाटी, वेग आणि परिश्रमामुळे स्पीड स्केटिंग रेसमध्ये आनंदकुमार वेलकुमार भारताचा पहिला जागतिक विजेता बनला आहे. आजच्या युवापिढीसाठी त्याची कार्यकिर्द अतिशय प्रेरणादायी आहे. आनंदकुमार वेलकुमारच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी X वर पोस्ट करून आनंदकुमार वेलकुमारच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल कौतुक केले. रिजिजू म्हणाले की, 'भारतीय खेळांसाठी किती गौरवशाली क्षण! आनंदकुमार वेलकुमारने 2025 च्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियशिपमध्ये 1000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुर्वणपदक जिंकले. या खेळात आनंदकुमार वेलकुमार पहिला भारतीय वर्ल्ड चॅम्पियन बनला. तुझा अभिमान आहे, चॅम्प'.