नवी दिल्ली: जगभरात नेहमी वदग्रस्त निर्णयांमुळे चर्चेत असणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याने केलेल्या एक धक्कादायक निर्णय. परदेशी टीव्ही शो पाहिल्यास उत्तर कोरियातील नागरिकांना थेट मृत्यूदंडची शिक्षा मिळेल. संयुक्त राष्ट्रांच्या नव्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
किम जोंग उनच्या शासनकाळात परदेशी टीव्ही शो पाहणं हा थेट गुन्हा मानला जातो आणि शिक्षा? थेट मृत्यूदंड. फक्त शो पाहिलाच तर नाही, तर हे परदेशी टीव्ही शो इतरांना दाखवले किंवा शेअर केले, तरीही मृत्यूदंडाचीच शिक्षा दिली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, 2014 नंतर उत्तर कोरिया देशातील कायदेशीर अधिकारची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. कोरोनानंतर तर फाशी देण्याचं प्रमाण वाढलं आहे. गुन्हेगारांना मृत्यूपर्यंत फासावर लटकवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
हेही वाचा: IND vs PAK Asia Cup 2025 Toss: पाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय; जाणून घ्या दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
उत्तर कोरियातील 'हे' नियम तुम्हाला माहित आहे का?
उत्तर कोरियातील नागरिकांवर सरकारकडून सतत पाळत ठेवली जाते.
कोणालाही सरकारविरोधात बोलण्याची परवानगी नाही.
मनोरंजनापासून माहिती मिळवण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट कडक नियमांच्या चौकटीत आहे.
उत्तर कोरियातून पळून गेलेल्या एका महिला नागरिकाने सांगितले की, 'माझ्या तीन मैत्रिणींकडे जेव्हा दक्षिण कोरियन सामग्री आढळून आले, तेव्हा त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जेव्हा माझ्या 23 वर्षीय मित्राला अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हेगारांसोबत खटला चालवण्यात आला. इतकंच नाही, तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यादरम्यान, मी तिथे उपस्थित होते'.
उत्तर कोरियातील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या कडक निर्बंधांमुळे उत्तर कोरियातील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.