Tuesday, September 16, 2025 01:01:19 PM

Nashik School Bomb Threat: नाशिकमधील शाळेला बॉम्बची धमकी; पोलीस आणि बॉम्ब पथकाकडून शोधमोहीम सुरू

या ईमेलमध्ये केंब्रिज हायस्कूलच्या बाथरूममध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. या घटनेमुळे प्रशासन आणि पालक वर्गात एकच खळबळ उडाली.

nashik school bomb threat नाशिकमधील शाळेला बॉम्बची धमकी पोलीस आणि बॉम्ब पथकाकडून शोधमोहीम सुरू

Nashik School Bomb Threat: नाशिकमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 16 सप्टेंबर पहाटे 2:45 वाजता इंदिरानगर पोलीस स्टेशनला एका बनावट ई-मेल आयडीवरून धमकी मिळाली. या ईमेलमध्ये केंब्रिज शाळेच्या बाथरूममध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. या घटनेमुळे प्रशासन आणि पालक वर्गात एकच खळबळ उडाली. निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितले की, शाळा प्रशासनाने तातडीने कारवाई केली. मानक कार्यपद्धतीनुसार बॉम्ब पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. 

हेही वाचा - Shardiya Navratri 2025: नवरात्रोत्सवामध्ये एसटी महामंडळाची खास सोय, साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी विशेष बस सेवा

बॉम्ब पथकाकडून शोधमोहीम - 

बॉम्ब शोधक पथकाने शाळेच्या परिसराची सखोल तपासणी केली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे शाळेला कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, सायबर पोलिस स्टेशन या प्रकरणाच्या तपासात सहभागी झाले असून धमकी देणाऱ्या बनावट ई-मेलचा उगम शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस या धमकीला खोटी आणि भीती निर्माण करणारी कारवाई मानत आहेत. पोलिसांनी सांगितले की, सध्या शाळेतील वर्ग सुरू आहे. आणखी कोणतीही धमकी आलेली नाही. प्रशासन पालक आणि विद्यार्थ्यांना अनावश्यक भीती न बाळगण्याचे आवाहन करत आहे.

हेही वाचा - Metro-3 Aqua Line: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो-3 चा अखेरचा टप्पा दसऱ्याला सुरू होणार; संपूर्ण मार्गावरील 27 स्टेशन जाणून घ्या

मुंबई उच्च न्यायालयाला धमकी 

काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता, परंतु तपासानंतर ती धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले. 22 ऑगस्टला इस्कॉन मंदिरालाही ई-मेलद्वारे धमकी मिळाली होती, जी खोटी निघाली. मे 2025 मध्ये महाराष्ट्र सचिवालयालाही बॉम्ब धमकीचा ई-मेल मिळाल्याने सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र, तपासादरम्या ही धमकी बनावट असल्याचे समोर आले होते. 
 


सम्बन्धित सामग्री