Friday, September 19, 2025 12:46:09 PM

Delhi BMW Accident : आरोपी गगनप्रीतला मोठा झटका, न्यायालयीन कोठडी; 'हजारो अपघात होतात', या युक्तिवादामुळे संताप

रविवारी दिल्लीत झालेल्या बीएमडब्लूच्या अपघातात नवजोत सिंग यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. या प्रकरणी आरोपी गगनप्रीतच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. तिला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

delhi bmw accident  आरोपी गगनप्रीतला मोठा झटका न्यायालयीन कोठडी हजारो अपघात होतात या युक्तिवादामुळे संताप

नवी दिल्ली : दिल्लीमधील कॅन्टॉन्मेंट भागात भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत वित्त मंत्रालयाचे उपसचिव नवजोत सिंग (वय 57) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी अटक झालेल्या कारचालक गगनप्रीत कौर हिला दिल्ली न्यायालयाने 27 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दरम्यान, जामिनासाठी तिच्या वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद संतापजनक आहे, ज्यामुळे गगनप्रीतच्या विरोधात तीव्र लाट उसळली आहे.

नेमके काय घडले?
रविवारी (14 सप्टेंबर) दुपारी झालेल्या या अपघातानंतर, पोलिसांनी गगनप्रीत कौरला अटक केली होती. तिच्यावर मनुष्यवधाचा (हत्या न ठरणारा) आणि अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, जामिनासाठी तिने न्यायालयात अर्ज दाखल केला.

हेही वाचा - Charlie Kirk: 'चार्ली कर्कला मारले कारण...'; कर्कच्या मारेकऱ्याने जोडीदाराला सांगितला होता हत्येचा संपूर्ण कट

गगनप्रीतच्या वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद
"नवजोत सिंग यांचा मृत्यू होणे दुर्दैवी आहे, पण देशात दरवर्षी 5,000 अपघात होतात, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही."
"या अपघातासाठी फक्त माझ्या अशिलास (गगनप्रीत कौर) जबाबदार धरता येणार नाही. अपघात झाला तेव्हा बाजूने जाणारी डीटीसी बस आणि रुग्णवाहिकेलाही आरोपी ठरवले पाहिजे."
याशिवाय, या अपघातात गगनप्रीतलाही थोडी दुखापत झाली होती. तिलाही रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून उपचारांनंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याबाबतही तिला स्वतःला दुखापत झालेली असताना तिला पोलिसांनी ताब्यात घ्यायला नको होते, असे तिचे म्हणणे आहे.

नवजोत यांची दुचाकी डीटीसी बसलाही धडकली होती
या युक्तिवादातून गगनप्रीतने अपघाताची जबाबदारी थेटपणे स्वीकारलेली नाही, उलट भारताच्या वाहतूक व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. न्यायालयाने या प्रकरणातील पुढील सुनावणी शनिवारपर्यंत स्थगित केली आहे आणि बीएमडब्ल्यू अपघाताशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि पोलिसांची कारवाई
या प्रकरणात पोलिसांना गंभीर पुरावे मिळाले आहेत. गगनप्रीत आणि तिच्या पतीने अपघातानंतर नवजोत सिंग आणि त्यांच्या पत्नीला जवळच असलेल्या अनेक मोठ्या रुग्णालयांपैकी एकामध्ये घेऊन जाण्याऐवजी, तब्बल 19 किलोमीटर दूर असलेल्या एका लहान रुग्णालयात नेले. तसेच, त्यांनी पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. पोलिसांच्या मते, आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 281 (वेगाने वाहन चालवणे), 125बी (दुसऱ्याचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोक्यात पाडणे), 105 (मनुष्यवध) आणि 238 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे गगनप्रीतला मोठा झटका बसला असून, तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा - Sangli Fake IT Raid Loot Case : सांगली हादरली! 'स्पेशल 26' स्टाईलने डॉक्टरच्या घरात दरोडा, 2 कोटींचा ऐवज लुटला


सम्बन्धित सामग्री