Friday, September 19, 2025 01:11:37 PM

Maharashtra Weather Update: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 3 दिवस 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

आज पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

maharashtra weather update राज्यात मुसळधार पावसाचा इशारा पुढील 3 दिवस या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्रता काहीशी कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

घाटमाथा आणि मराठवाड्यात तीव्र पाऊस

सध्या मराठवाड्यात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यातून वाहणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागात पावसाची तीव्रता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नाशिक, अहमदनगर, घाटमाथा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, नागपूर, नंदुरबार आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Palghar Chemical Factory Blast: पालघर रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, 4 जखमी

मुंबईत रिमझिम, कोकणात मध्यम पाऊस

आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये रिमझिम पावसाची सर सुरू आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नवरात्रकाळातही पावसाचा प्रभाव कायम राहू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा - Chhagan Bhujbal : 'आंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांचा हात'; छगन भुजबळांचा गंभीर आरोप

पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान, पूर्व बिहार व ईशान्येकडील भागातील हवामान स्थितींमुळे पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 20 सप्टेंबरपर्यंत दार्जिलिंग, कालिम्पोंग, जलपाईगुडी, अलीपुरद्वार आणि कूचबिहार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण बंगालमध्ये 22 सप्टेंबरपर्यंत विजांसह गडगडाटी पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


सम्बन्धित सामग्री