पुणे: सध्या, महायुतीचा सरकार असून यात अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप हे तिघेही कार्यरत आहेत. महायुतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात नेहमीच राजकीय विनोद पाहायला मिळतात. ते सहज एकमेकांवर टीकेचा वर्षाव करतात. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना सांभाळून घेतात. अशीच एक घटना शुक्रवारी पुण्यात घडली, ज्यात अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. हा राजकीय विनोद होताच सर्वत्र हास्याची लाट उसळली.
हेही वाचा: Pune Accident : खड्ड्यामुळे मोठा अनर्थ, दुचाकी घसरली; ज्येष्ठ नागरिकाला कारने चिरडलं
शुक्रवारी, पुण्यातील केसरी वाडा याठिकाणी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
हेही वाचा: 15 हजार पगार असलेला माजी क्लार्क 24 घरांचा मालक, 30 कोटींची मालमत्ता
कार्यक्रम सुरु झाल्यानंतर सूत्रसंचालन करणारी महिला म्हणाली की, 'मंचावर दोन दादा आहेत, एक अजित दादा आणि दुसरे रोहित दादा'. त्यानंतर, आपली चूक लक्षात येताच, 'चंद्रकांत दादा पण आहेत', असं म्हणत सूत्रसंचालन करणाऱ्या महिलेने सर्व दादांचे उल्लेख केले. यावर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. राजकीय विनोद करत अजित पवार म्हणाले, 'कदाचित अजून देखील त्यांना ते कोल्हापूरचे आहे असे वाटते. यावर, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे'. तसेच, भाषण सुरू करण्यापूर्वी अजित पवार म्हणाले की, 'आपण एकत्र येणार होतो, तेव्हाच ठरलं होतं की मीच पालकमंत्री असेल'.