Wednesday, August 20, 2025 05:50:42 PM

Bank Holidays in July 2025: जुलै 2025 मध्ये 13 दिवस बँकांना सुट्टी; राज्यनिहाय यादी जाहीर

जुलै 2025 मध्ये 13 दिवस बँकांना सुट्टी राहणार आहे. सण, शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे कामकाजावर परिणाम होणार असून नागरिकांनी व्यवहार नियोजनपूर्वक करावेत.

bank holidays in july 2025 जुलै 2025 मध्ये 13 दिवस बँकांना सुट्टी राज्यनिहाय यादी जाहीर

Bank Holidays in July 2025:  जुलै 2025 मध्ये बँकांना एकूण 13 दिवस सुट्टी असणार आहे. विविध सण, उत्सव आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँकांची कामकाज व्यवस्था काही प्रमाणात विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आपली आर्थिक कामे योग्य नियोजनानुसार पार पाडावीत, असा सल्ला दिला जात आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या यादीनुसार, या महिन्यातील सुट्ट्यांमध्ये 4 रविवार, 2 शनिवारी आणि विविध राज्यांतील प्रादेशिक सणांचा समावेश आहे. मात्र, या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू नाहीत, त्यामुळे राज्यनिहाय सुट्यांमध्ये बदल आहे.

हेही वाचा: Today's Horoscope: कोणाला मिळणार भाग्याची साथ, कोणाला घ्यावी लागणार काळजी? वाचा राशिभविष्य

जुलै 2025 मधील बँकांच्या सुट्ट्या:

3 जुलै – खर्ची पूजा (त्रिपुरा)
5  जुलै – गुरु हरगोविंदसिंहजी जन्मोत्सव (जम्मू-काश्मीर)
6 जुलै – रविवार (सर्वत्र)
12 जुलै – दुसरा शनिवार (सर्वत्र)
13 जुलै – रविवार (सर्वत्र)
14 जुलै – बेह दीन्खलाम (मेघालय)
16 जुलै – हरेला सण (उत्तराखंड)
17 जुलै – यू तिरोतसिंह पुण्यतिथी (मेघालय)
19 जुलै – केरपूजा (त्रिपुरा)
20 जुलै – रविवार (सर्वत्र)
26 जुलै – चौथा शनिवार (सर्वत्र)
27 जुलै – रविवार (सर्वत्र)
28 जुलै – दुक्पा त्से-जी (सिक्कीम)

नागरिकांनी या सुट्यांचा विचार करून बँकेशी संबंधित व्यवहार ठरवावेत, जेणेकरून अडथळा टाळता येईल. विशेषतः चेक क्लिअरिंग, कॅश ट्रान्झॅक्शन किंवा कर्ज व्यवहारांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
 


सम्बन्धित सामग्री