Thursday, September 04, 2025 09:31:54 PM

'बीडमध्ये हैवानियत सुरूच'

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत.

बीडमध्ये हैवानियत सुरूच

बीड : बीडमधील आष्टीत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा हादरला आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. संतोष देशमुख प्रकरण होऊनही बीडमध्ये हैवानियत सुरूच असे दमानिया यांनी म्हटले आहे. 

बीडच्या आष्टीमध्ये संतोष देशमुखांसारखी आणखी एकाची हत्या करण्यात आली. बीडमधली परिस्थिती हाताबाहेर गेलीये. मुख्यमंत्र्यांनी आतातरी बीडवर अधिवेशनात बोलावं असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. तसेच पालकमंत्री झाल्यापासून अजित पवार एकदाच बीडमध्ये गेले. बीडमधील शिक्षक आत्महत्या आणि आष्टीतील घटनेवरुन दमानिया आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 

हेही वाचा : राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार?

आष्टीत मारहाणीत तरुणाची हत्या 
बीडमध्ये आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास बनसोडे नावाचा तरूण कामाला होता. हा जालना जिल्ह्यातील होता. भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी त्याचे प्रेम प्रकरण होते. हा तरूण घराच्या मागील शेतात क्षीरसागर यांच्या मुलीबरोबर दिसल्याने त्याला दोन दिवस डांबून मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे कळताच कडा चौकीला कळवण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. 

बीडमधील शिक्षकाची आत्महत्या 
बीड जिल्ह्यातील केज येथे आत्महत्येची घटना घडली आहे.  धनंजय अभिमान नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. केळगाव येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. बँकेच्या प्रांगणात गळफास घेऊन त्याने आत्महत्येची केली. आत्महत्येआधी त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीची माफी मागितली. अनेक वर्षांपासून त्यांचा पगारच झालेला नव्हता. लेकीला लिहिलेल्या पत्रात सहा जणांचा उल्लेख त्याने केला आहे. वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री