Thursday, August 21, 2025 02:12:23 AM

सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या

व्याजाने दिलेले पैसे परत न दिल्याने सावकारांनी व्यापाराला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे, व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या

आमिर हुसैन. प्रतिनिधी. बीड: व्याजाने दिलेले पैसे परत न दिल्याने सावकारांनी व्यापाराला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे, व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बीड शहरातील काळा हनुमान ठाणा भागात घडली असून मृत व्यापाऱ्याचे नाव राम फटाले आहे. राम फटाले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी सात सावकारांची नावे लिहिली आहेत. यामध्ये, विमुक्त -भटके आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्यासह इतर सहा जणांचा समावेश आहे.  या प्रकरणात मृत राम फटाले यांच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पेड बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी लक्ष्मण जाधव यांना अटक केली.

हेही वाचा: बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेला सोमवारपासून सुरुवात

सुसाईड नोटमध्ये फटालेंनी मागितली कुटुंबीयांची माफी

राम फटाले यांनी सहा पानांची सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये 'मी चांगला पती पिता होऊ शकलो नाही', अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 'तुम्ही सर्वजण चांगले रहा. मुलांनो, अभ्यास करा', पत्नीला सर्व जबाबदारी स्वीकारण्याबाबत राम फटाले म्हणाले. तसेच, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना उद्देशून पत्र लिहीत सावकारांची नावे देखील नमूद केले आहेत.


सम्बन्धित सामग्री