पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी 1 हजार 670 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात एकूण 11 जण आरोपी आहेत. वैष्णवीची सासू, सासरा, नवरा, दीर, नणंद यांच्यासह 5 जणांचा समावेश या प्रकरणात करण्यात आला आहे. पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे या 23 वर्षीय विवाहितेला सासरच्या लोकांनी छळले. या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, दीर, सासू सासरे आणि नणंद यांना अटक केली होती. काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर एक एक पुरावे समोर येत गेले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई केली आणि आता पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
हेही वाचा: प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी दीपक काटेला दोन दिवसांची पोलीस कोठडी
वैष्णवी हगवणे प्रकरण
वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात 1670 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलं. या दोषारोप पत्रात एकूण 11 जणांना आरोपी करण्यात आलं. वैष्णवी हगवणे प्रकरणातील मुख्यरूपी असलेल्या वैष्णवीच्या सासरा, सासू,नवरा, दीर, नणंद यांच्यासह एकूण 5 जणांचा दोषारोपपत्र उल्लेख आहे. तर निलेश चव्हाण याचा देखील गटात सामील असल्याचा दोषारोपपत्रात करण्यात उल्लेख आला आहे. यापैकी पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत तर सहा आरोपी जामिनावर बाहेर आहेत.
दोषारोपपत्रातील आरोपींची नावं
शशांक हगवणे - नवरा
राजेंद्र हगवणे - सासरा
लता हगवणे - सासू
सुशील हगवणे - दीर
करिष्मा हगवणे - नणंद
निलेश चव्हाण - करिष्माचा मित्र
प्रीतम पाटील - हगवणे पितापुत्रांना आश्रय देणारे
मोहन ऊर्फ बंडू भेगडे - हगवणे पितापुत्रांना आश्रय देणारे
बंडू फाटक - हगवणे पितापुत्रांना आश्रय देणारे
अमोल जाधव- हगवणे पितापुत्रांना आश्रय देणारे
राहुल जाधव - हगवणे पितापुत्रांना आश्रय देणारे