विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाटा जवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. यात शीला विश्वकांत शिंदे (वय 35), परी विश्वकांत शिंदे (वय 4 वर्षे) रा.गोंदी ता.अंबड या दोघी मायलेकीचा मृत्यू झाला आहे.
या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील गोंदी येथून विश्वकांत शिंदे (वय 35 वर्ष) त्यांची पत्नी शीला विश्वकांत शिंदे (वय 32 वर्ष) मुलगी परी विश्वकांत शिंदे वय 4 वर्षे व छोटी विश्वकांत शिंदे वय एक वर्ष हे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकी क्रमांक MH 21 BW 1850 ने बीड ते छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना शुक्रवार दि. 20 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बीडकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक KA 56-4201ने जोराची धडक दिली . या भीषण अपघातामध्ये शीला विश्वकांत शिंदे व परी विश्वकांत शिंदे या दोघी ट्रकच्या चाकाखाली गंभीर जखमी झाल्याने चिमुकली परी शिंदे ही जागीच ठार झाली तर आई शीला शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर येथे माळीवाडी भोकरवाडी टोल प्लाझाच्या रुग्णवाहिका 1033 ने उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : भिवंडीतील कामवारी नदीत बुडून दोन भावांचा मृत्यू
विश्वकांत शिंदे व छोटी शिंदे या दोघांवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेत मायलेकीचा मृत्यू झाल्याने नागरिकांकडून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अपघात घटनास्थळी महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकारी आर. के.निकम, राम चव्हाण, कर्मचारी जी.डी. गोल्डे महामार्ग पोलीस केंद्र जालना व पोलीस स्टेशन अंबड येथील हेडकॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण, भोकरवाडी येथील रुग्णवाहिकेतील कर्मचारी विजय धारकर, रवी गाडेकर, आत्माराम गाडेकर,आय आर बी चे पेट्रोलिंग कर्मचारी विकास जाधव ,शिवचरण ,जाधव चंद्रशेखर तसेच बबन लोंढे अभिषेक शिरसकर आदिती मदत कार्य केले आहे. या घटनेची नोंद जामखेड पोलीस चौकी तालुका अंबड येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.