Sunday, September 21, 2025 07:38:41 PM

Mumbai Local Train: मुंबईत डिसेंबर 2025 पासून बंद दरवाज्यांच्या लोकल ट्रेन सुरू होणार; रेल्वे मंत्र्यांची घोषणा

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी अधिकृतपणे घोषणा केली की, डिसेंबर 2025 पासून मुंबईतील सर्व लोकल ट्रेन बंद दरवाज्यांसह धावतील.

mumbai local train मुंबईत डिसेंबर 2025 पासून बंद दरवाज्यांच्या लोकल ट्रेन सुरू होणार रेल्वे मंत्र्यांची घोषणा

Mumbai Local Train: मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी रेल्वे विभागाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी अधिकृतपणे घोषणा केली की, डिसेंबर 2025 पासून मुंबईतील सर्व लोकल ट्रेन बंद दरवाज्यांसह धावतील. हा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान झालेल्या अपघातानंतर घेतला गेला, ज्यात गर्दीमुळे अनेक प्रवासी ट्रेनमधून खाली पडले होते. सर्व एसी आणि नॉन-एसी गाड्यांमध्ये बंद दरवाजे असतील. रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले, 'मुंबईत प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. म्हणूनच, सर्व लोकल गाड्यांमध्ये बंद दरवाजे असतील.' 

तीन महत्त्वाचे प्रयोग

रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की, 'या दिशेने तीन महत्त्वाचे प्रयोग करण्यात आले आहेत. पहिला, विद्यमान लोकल ट्रेनमध्ये रेट्रोफिट दरवाजे बसवले जातील. दुसरा, सर्व नवीन बांधलेल्या नॉन-एसी गाड्यांमध्ये बंद दरवाजे असतील. तिसरा, नवीन एसी गाड्या नैसर्गिकरित्या बंद दरवाजे असलेल्या बांधल्या जातील.'

हेही वाचा -  Laxman Hake: ओबीसी आंदोलन थांबवण्यासाठीचा..., व्हायरल ऑडिओ कॉलनंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया

दरम्यान, रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की, आतापर्यंत तीन प्रयोग यशस्वी झाले आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत विद्यमान गाड्यांवर बंद दरवाजे बसवण्याचे काम पूर्ण होईल. या उद्देशासाठी 238 एसी लोकल ट्रेनसाठी निविदा जारी करण्यात आल्या असून प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान अस्वस्थता येऊ नये म्हणून गाड्यांमध्ये पुरेसी ऑक्सिजन पातळी राखली जाईल. 

हेही वाचा - Woman Rescue: सोलापूरमध्ये सीना नदीत पडलेल्या महिलेचे धाडसी तरुणांनी वाचवले प्राण; पहा व्हायरल व्हिडिओ

मुंबईकरांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास

बंद दरवाज्यांच्या लोकल ट्रेन सुरू केल्याने लाखो मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल. हा निर्णय अपघात कमी करण्यास मदत करेल. तसेच मुंबईच्या लोकल ट्रेनच्या आधुनिकीकरणाची दिशा देखील दाखवेल.
 


सम्बन्धित सामग्री