Sunday, August 31, 2025 10:57:54 PM

दहशतवादी हल्ल्यातील जखमींशी साधला फडणवीसांनी संवाद

लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना भेटण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन गेले होते. या दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्हिडिओ कॉलद्वारे जखमींची विचारपूस केली.

दहशतवादी हल्ल्यातील जखमींशी साधला फडणवीसांनी संवाद

मुंबई: निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये अनेक निष्पाप पर्यटकांनी आपले प्राण गमावले तर काही पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आढावा घेतला. त्यासोबतच, लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना भेटण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन गेले होते. या दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ कॉलद्वारे जखमींची विचारपूस केली. त्यासोबतच, त्यांनी पीडितांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. त्यामुळे पीडितांना दिलासा मिळाला आहे. यावेळी, लष्करी रुग्णालयात उपचार करणाऱ्या लष्करी डॉक्टर्सचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.

त्यासोबतच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 'जम्मू काश्मीर येथील अडकलेल्या नागरिकांना सुखरूप पोहोचण्यासाठी आम्ही सतत संपर्कात आहोत,' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

 

 


सम्बन्धित सामग्री