Sunday, August 31, 2025 08:47:19 PM

Rapido : रॅपिडोला 50 रुपयांचा दावा करणं पडलं महागात! भरावा लागणार 10 लाखांचा दंड; नेमकं झालं काय ?

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे रॅपिडोच्या कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ग्राहकांची दिशाभूल केल्यामुळे, रॅपिडो कंपनीवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

rapido  रॅपिडोला 50 रुपयांचा दावा करणं पडलं महागात भरावा लागणार 10 लाखांचा दंड नेमकं झालं काय

मुंबई: दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे रॅपिडोच्या कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. 'जर 5 मिनिटांत तुम्हाला रिक्षा नाही मिळाली तर रॅपिडो कंपनी तुम्हाला देणार 50 रुपये'. मात्र, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) हा दावा खोटा आणि ग्राहकांची दिशाभूल करणारा मानला आहे आणि त्यामुळे, रॅपिडो कंपनीवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुरुवारी, ग्राहक मंत्रालयाने सांगितले की, 'ज्या ग्राहकांना अजूनही ऑफरचे पैसे मिळाले नाहीत, त्यांना 50 रुपये परत करण्यात यावे'. 

वाढत्या तक्रारींमुळे झाला पर्दाफाश

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या आकडेवारीनुसार, जून 2024 पासून ते जुलै 2025 दरम्यान रॅपिडो विरोधात 1 हजार 224 तक्रारी प्राप्त झाल्या. मागील 14 महिन्यांत ही संख्या फक्त 575 होती. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (CCPA) तपासात असे आढळून आले की, जाहीरातींमधील डिस्क्लेमर छोटे होते, ज्यामुळे, ग्राहकांना वाचता येत नव्हते. कंपनीने जाणीवपूर्वक या अटी आणि शर्थी लपवण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा: 'ए पिल्लू... इकडे ये...', म्हणत राज ठाकरेंनी पत्रकार परिषद सुरु असतानाच त्याला आवाज दिला आणि...

50 रुपये नाही, फक्त रॅपिडो कॉईन्स

रॅपिडोे कंपनीने असा दावा केला की, '50 रुपये न देता 50 रुपयांच्या किंमतीचे कॉईन्स दिले जातील, ज्याचा वापर तुम्ही फक्त रॅपिडोची बाईक चालवण्यासाठी वापरू शकता आणि हे फक्त 7 दिवसांसाठी वैध होते'. 

तात्काळ जाहिरात बंद करण्याचे आदेश

मंत्रालयाने सांगितले की, 'अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे ऑफरचे मूल्य कमी हेते आणि ग्राहकांची दिशाभूल होते'. या आधारावर, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) रॅपिडोला दिशाभूल करणारी जाहीरात तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यासह, सामान्य ग्राहकांसाठी अशी शिकवण आहे की, त्यांनी कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी काळजीपूर्वक अटी आणि शर्थी वाचले पाहिजेत. तसेच, 'रोख' आणि 'व्हाउचर' मधील अंतर समजून घ्या. बऱ्याचदा, कंपन्या रोख रक्कम देण्याऐवजी कूपन, पॉइंट्स किंवा कॉईन्स देतात, ज्यांची वैधता मर्यादित असते.


सम्बन्धित सामग्री