महाराष्ट्राचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. विधानसभेत, महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 11 वा अर्थसंकल्प आहे. यामध्ये मेट्रो विकाससंबंधित घोषणादेखील करण्यात आले होते. या अर्थसंकल्पामध्ये पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गतच्या विस्तारासाठी 9,897 कोटी रुपयांचा प्रस्ताव जाहीर केला असून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यासोबतच, महाराष्ट्राच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये पुणे मेट्रोसोबतच, मुंबई आणि नागपूर मेट्रोच्या विस्तारासाठीदेखील प्रस्ताव जाहीर केला आहे.
हेही वाचा: Maharashtra Budget 2025: 2047 पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था 1.5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे ध्येय
महाराष्ट्रात मेट्रोचा विस्तार:
पर्यावरणाला अनुकूल, शाश्वत आणि सुरळीत वाहतूक प्रदान करण्यासाठी, मुंबई, नागपूर आणि पुणे येथे एकूण 143.57 किमी मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. सध्या, दररोज 10 लाखांहून अधिक प्रवासी मेट्रो सेवांचा वापर करतात.
हेही वाचा: Maharashtra Budget 2025: अजित पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 10
महाराष्ट्रातील आगामी मेट्रो प्रकल्प:
मुंबई: या वर्षी 41.2 किमी मेट्रो मार्ग सुरू केले जातील.
पुणे: 23.2 किमी नवीन मेट्रो मार्ग जोडले जातील.
एकूण विस्तार: या वर्षी 64.4 किमी मेट्रो मार्ग कार्यरत असतील.
भविष्यातील योजना: पुढील पाच वर्षांत एकूण 237.5 किमी मेट्रो मार्ग कार्यान्वित केले जातील.
नागपूर: नागपूर मेट्रोच्या 40 किमीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, तर 6,708 कोटी रुपयांचा दुसरा टप्पा (43.80 किमी) प्रगतीपथावर आहे.
ठाणे सर्कुलर मेट्रो आणि स्वारगेट - कात्रज मेट्रो यांच्या विस्तार प्रकल्पांना केंद्रीय मंजुरी मिळाली आहे.
पुणे मेट्रो टप्पा 2: खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग कॉरिडॉर ₹9,897 कोटींच्या प्रस्तावासाठी मंजुरीची वाट पाहत आहेत.
मुंबई मेट्रो: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होईल.
अशाप्रकारे, पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग मार्गी लावण्याचे करण्याचे लक्ष्य आहे.