महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयागराज येथे जाऊन गंगा नदीत पवित्र स्नान केलंय. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदार खासदारांसोबत शाही स्नान केले. प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर महाकुंभ सुरू असून करोडोंच्या संख्येने अनेक भाविक अभिनेता अभिनेत्री त्याच बरोबर नेते मंडळी प्रयागराज येथे जाऊन महाकुंभात शाही स्नान करताय. अशातच आता महाकुंभाच्या 43 व्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदार खासदारांबरोबर शाही स्नान केलंय. शाही स्नान म्हणजे महाकुंभ मेळ्यात पवित्र नद्यांमध्ये केले जाणारे स्नान. या स्नानाला धार्मिक महत्त्व आहे. शाही स्नान करण्याचे अनेक फायदे मानले जातात.
हेही वाचा: Bank of Maharashtra Loan Interest Rate: बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्याजदरांमध्ये कपात
शाही स्नानाचे महत्त्व:
शाही स्नानाने मनातील अशुद्धता दूर होतात.
शाही स्नानाने पापांपासून मुक्ती मिळते.
शाही स्नानाने आत्मा पवित्र होते.
शाही स्नानाने शुभता येते.
शाही स्नानाची वैशिष्ट्ये:
शाही स्नान हे महाकुंभ मेळ्याचे एक प्रमुख अनुष्ठान आहे.
शाही स्नान हे रंग-बिरंगे जुलूस, भक्ति आणि भव्यता के लिए प्रसिद्ध आहे.
शाही स्नान हे संत आणि नागा भिक्षूंसाठी विशेष महत्त्व आहे.
शाही स्नान हे कुंभमेळ्याच्या परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे.