Sunday, August 31, 2025 09:30:36 AM

Buldhana Shocker: शिळ्या अन्नावरून बाप-लेकात वाद; मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकला

आरोपी शिवाजी तेल्हारकर यांनी रागाच्या भरात आपल्या वडिलांची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून पूर्णा नदीत फेकले.

buldhana shocker शिळ्या अन्नावरून बाप-लेकात वाद मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकला

Buldhana Shocker: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावात धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी शिवाजी तेल्हारकर यांनी रागाच्या भरात आपल्या वडिलांची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून पूर्णा नदीत फेकले. या घटनेमुळे स्थानिक परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर आरोपीच्या पत्नीने पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला. मृत व्यक्तीचे नाव रामराव तेल्हारकर असून ते बोडखा गावचे रहिवासी होते. प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झाले की, मुलाने आपल्या वडिलांशी किरकोळ वाद केल्यामुळे हा गंभीर गुन्हा केला.

कुऱ्हाडीने वार करून मुलाची हत्या -  

पोलिसांनी सांगितले की, तू काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस, असे म्हणत वडिलांनी मुलाला फटकारले. त्यावेळी ताटात उरलेले अन्न का ठेवले आहे, यावरून वाद वाढला. संतापलेल्या शिवाजीने आपल्या वडिलांच्या शरीरावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली.

हेही वाचा - Ghaziabad News : पत्नीची फिगर नोरा फतेहीसारखी दिसावी म्हणून छळ! रोज 3 तास​ व्यायाम, उपाशीही ठेवलं! मग पत्नीने..

हत्येनंतर, आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि सर्व तुकडे एका पोत्यात भरले. त्यानंतर हे पोते पूर्णा नदीत फेकले.  ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरु केला असून आरोपी शिवाजी तेल्हारकरला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी आणखी तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा - Student Shot Teacher in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये विद्यार्थ्याने झाडली शिक्षकावर गोळी, जेवणाच्या डब्यातून आणले पिस्तूल

ही घटना केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा विषय ठरली आहे. शिळ्या अन्नाच्या किरकोळ वादातून मुलाने वडिलांची हत्या केली ही घटना सामाजिक दृष्टिकोनातून गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. पोलिसांची पहिली चौकशी सुरू असून, घटनास्थळी साक्षीदारांची माहिती घेतली जात आहे. तसेच, आरोपीच्या मानसिक स्थितीचा देखील तपास केला जात आहे. गावकऱ्यांमध्ये सुरक्षिततेसंबंधी शंका निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पोलिसांनी गावात सतर्कता वाढवली आहे.
 


सम्बन्धित सामग्री