नवी मुंबई : काही दिवसांपूर्वी धुळे शहरातून काही बांगलादेशी ताब्यात घेण्यात आले होते. त्यातच आता अजून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतून 15 बांगलादेशी ताब्यात घेण्यात आलेय. धुळ्यात देखील काही दिवसांपूर्वी बांगलादेशी आढळले होते. धुळे शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहावर मागील काही दिवसांपूर्वी जबरी लूटमार झाल्याची घटना घडली होती. पोलिसांकडून तपास करत लूटमार करणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेतले त्यातच आता नवी मुंबई येथून 15 बांगलादेशी ताब्यात घेण्यात आल्याने एकच खळबळ उडालीय.
याबाबत सविस्तर:
बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करुन वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलीसांनी विशेष मोहीम राबवली. मागील दोन दिवसात नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून तब्बल 15 बांगलादेशी नागरिकांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बांगलादेशी नागरिकांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्डसह त्यांचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. हे बांगलादेशी नागरिक भारतात कसे आले यांचा तपास आता पोलीस करत आहेत.
दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या 15 जणांच्या संपर्कात आणखी कोणी आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला असून पोलीस पुढील तपस करीत आहेत. दरम्यान या बांगलादेशी नागरिकांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्डसह त्यांचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. हे बांगलादेशी नागरिक भारतात कसे आले यांचा तपास आता पोलीस करत आहेत.