Thursday, September 04, 2025 02:25:35 AM

कोकणातही हाऊसबोटींचा आनंद! आता रत्नागिरीत ‘केरळ फिल’

कोकणच्या निसर्गरम्य वातावरणाची भुरळ प्रत्येक पर्यटकांना पडते. आता केरळच्या धर्तीवर रत्नागिरीतही पर्यटकांना हाऊस बोटिंगची अनोखी सफर करता येणार आहे.

कोकणातही हाऊसबोटींचा आनंद आता रत्नागिरीत ‘केरळ फिल’


रत्नागिरी: कोकणच्या निसर्गरम्य वातावरणाची भुरळ प्रत्येक पर्यटकांना पडते. आता केरळच्या धर्तीवर रत्नागिरीतही पर्यटकांना हाऊस बोटिंगची अनोखी सफर करता येणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून 'सिंधुरत्न समृद्ध' योजनेअंतर्गत  महिला बचतगटांची एकूण पाच हाऊसबोट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  यापैकी पहिली हाऊसबोट राई बंदरामध्ये पर्यटकांसाठी सज्ज झाली आहे. 

या उपक्रमामुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर स्थानिक महिलांसाठी रोजगाराचाही नवा मार्ग खुला होणार आहे. खाडीपट्ट्याच्या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी या हाऊसबोटीमुळे मिळणार आहे. दोन मजली आणि आलिशान सोयींनी सुसज्ज असलेल्या या हाऊसबोटीत डायनिंग एरिया, प्रशस्त बेडरूम, रूममध्ये टीव्ही अशा अत्याधुनिक सुविधा आहेत. जयगडच्या खाडीत सध्या हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा :मुंबईत फिरण्यासाठी 'ही' ठिकाण आहेत उत्तम

या हाऊसबोटी आकर्षक चित्रांनी सजवण्यात आल्या असून, त्यांचा भव्यदिव्य देखावा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. यामुळे पाण्यावर तरंगणाऱ्या आलिशान हॉटेलसारखा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. 

– प्रतिनिधी, जय महाराष्ट्र


सम्बन्धित सामग्री