Sunday, August 31, 2025 11:35:31 AM

पुण्यात समलैगिंक जोडपे अडकले विवाहबंधनात; सोशल मीडियावर राम अन् श्याम व्हायरल

राम आणि श्याम या समलैंगिक जोडप्यांचा हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याची खरी रंगत शिकंडी ढोल ताशा पथकाने दाखवली.

पुण्यात समलैगिंक जोडपे अडकले विवाहबंधनात सोशल मीडियावर राम अन् श्याम व्हायरल

पुणे: काही वर्षांपूर्वी अभिनेता आयुष्मान खुराणा आणि जितेंद्र कुमार यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याचं नाव आहे 'शुभमंगल ज्यादा सावधान'. या चित्रपटातील प्रेमकथा थोडी हटके आहे. या चित्रपटात असलेल्या अमन (जितेंद्र कुमार) मुलीच्या नाहीतर मुलाच्या प्रेमात पडतो आणि लग्न करतो. असाच काहीसा प्रकार पुण्यात पाहायला मिळाला आहे. नुकताच, राम आणि श्याम या समलैंगिक जोडप्यांचा हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने 17 जून रोजी विवाह सोहळा पार पडला. तीन दिवस चाललेल्या या लग्न समारंभात हळदी आणि मेहंदी सारख्या पारंपारिक विधींचा समावेश होता. सर्वप्रथम, दाक्षिणात्य हिंदू परंपरेनुसार विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर, ख्रिश्चन विधीनुसार, त्यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले. या सोहळ्याची खरी रंगत शिकंडी ढोल ताशा पथकाने दाखवली.

काय म्हणाली मनस्वी?

या अनोख्या विवाह सोहळ्याबद्दल मनस्वी म्हणाली, 'हा विवाह सोहळा समाजातील बदलत्या मानसिकतेचा आहे. सामाजिक प्रगतीकडे आम्ही उचललेले हे एक पाऊल आहे. हा विवाह सोहळा LGBTQ+ समुदायासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. हे आपल्याला मोकळेपणाने प्रेम करण्याची आणि जीवन जगण्याची शक्ती देते'.


सम्बन्धित सामग्री