Sunday, August 31, 2025 06:10:38 AM

Vikhe Patil, Samant Meet Jarange: जरांगेंना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न; विखे-पाटील आणि मंत्री उदय सामंत चर्चा करणार

जरांगेंना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आणि उदय सामंत यांच्याकडून शिष्टाई दाखवली जात आहे. आज सकाळी 11 वाजता अहिल्यानगरमध्ये दोन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

vikhe patil samant meet jarange जरांगेंना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न विखे-पाटील आणि मंत्री उदय सामंत चर्चा करणार

 

मुंबई: मनोज जरांगे पाटील बुधवारी 27 ऑगस्ट रोजी मुंबईला निघाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे आंदोलन करणार आहेत. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली असून काही अटी-शर्ती लावल्या आहेत. मात्र आता  सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. जरांगेंना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आणि उदय सामंत यांच्याकडून शिष्टाई दाखवली जात आहे. आज सकाळी 11 वाजता अहिल्यानगरमध्ये दोन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. 

पुण्यातील जुन्नरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. त्याचा ताफा लवकरच मुंबईला पोहोचणार आहे. यातच आता सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. विखे-पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यात चर्चा होणार आहे. जरांगेचा ताफा मुंबईत येऊ नये तसेच त्यांचे आंदोलन थांबवण्यासाठी विखे-पाटील आणि सामंतांकडून तडजोडीचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सरकारची जरांगेंसोबत चर्चा होईल का? आणि ही चर्चा सफल होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Uddhav and Raj Thackeray Meet: उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब राज यांच्या बाप्पाचं दर्शन, राज आणि उद्धव यांच्यात 10 मिनिटे चर्चा, नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील मुंबईला आंदोलनासाठी निघालेले आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी आज सकाळी 11 वाजता अहिल्यानगर येथे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात महत्वाची चर्चा होणार आहे. मनोज जरांगे-पाटील यांना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आणि उदय सामंत यांच्याकडून शिष्टाई दाखवली जात आहे. 

जरांगेच्या आंदोलनाला परवानगी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची सशर्त परवानगी मिळाली आहे. एक दिवस आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी अटीशर्तींसह परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. आंदोलकांची संख्या 5 हजारांपेक्षा जास्त नसावी ही महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. यावर बोलताना, सगळ्या नियमांचं मी पालन करणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोवर मी आंदोलन करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील आंदोलनावर ठाम असल्याचे दिसत आहे. एक दिवसात कसं उपोषण करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आंदोलन एक दिवसाचं नाही, तर बेमुदत असेल. तसेच जरांगे यांनी सरकार आणि न्यायालयाचे आभार मानले आहेत. 


सम्बन्धित सामग्री