मुंबई: मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत. यावर, वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, 'कायद्याचं राज्य आहे. जेव्हा आम्ही तक्रार दाखल केली होती, तेव्हा नियम सूचित केले नव्हते. आता आंदोलनाच्या संदर्भाने, मग ते कोणत्याही घटकांचे आंदोलन असो, सर्वांसाठी एक नियमावली जाहीर झाली आहे'.
हेही वाचा: Manoj Jarange Aandolan : आंतरवाली सराटी ते आझाद मैदान व्हाया जुन्नर; या मार्गांवरून जातोय जरांगेंचा मोर्चा
पुढे सदावर्ते म्हणाले की, 'जेव्हा आम्ही अर्ज केलो होतो की, मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंना आंदोलन करू देऊ नका, तेव्हा नियम सूचित केले नव्हते. मात्र, नियम सूचित झाल्यानंतर जरागेंनी अर्ज केला. त्या अर्जाला संबंधित वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी कायदेशीरदृष्ट्या नियमांच्या आधारे. म्हणजेच, सांगायचं झालं तर नऊ घंट्यासाठी, नऊ घंट्यासाठी, नऊ घंट्यासाठी, एक घंट्यासाठी, दोन घंट्यासाठी, तीन घंट्यासाठी, चार घंट्यासाठी, पाच घंट्यासाठी, सहा घंट्यासाठी, सात घंट्यासाठी, आठ घंट्यासाठी, नऊ घंट्यासाठी. नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जी आहे, रीतसर नियमांप्रमाणे आणि अटी-शर्तींच्या आधारे आंदोलन करू शकतात'.