Sunday, August 31, 2025 09:10:55 PM

मित्राच्या साहाय्याने नवऱ्याने केला बायकोवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला– कपडे धुताना घडलेलं भयानक वास्तव

महिला घरात कपडे धूत असताना तिच्यावर तिच्याच नवऱ्याने मित्राच्या मदतीने जीवघेणा हल्ला केला.

मित्राच्या साहाय्याने नवऱ्याने केला बायकोवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला– कपडे धुताना घडलेलं भयानक वास्तव

म्हसळा: रायगड जिल्ह्यातील म्हसळा गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनीच एका महिलेवर प्राणघातक हल्ल्याची खळबळजनक घटना घडली. पती आणि त्याच्या मित्राने मिळून पत्नीवर निर्घृण हल्ला केला. कपडे धुत असताना अचानक झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.

कपडे धुताना मृत्यूच्या दारात!
महिला घरात कपडे धूत असताना तिच्यावर तिच्याच नवऱ्याने मित्राच्या मदतीने जीवघेणा हल्ला केला. लाकूड आणि स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून तिला निर्दयपणे मारहाण करण्यात आली. आधी पतीने लाकडाने डोक्यावर आणि हातावर जोरदार वार केले. त्यानंतर मित्राने थेट स्क्रू ड्रायव्हर गळ्यावर रोवला. दोन ते तीन वेळा वार झाल्यानंतर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली.

पोलिसांचा तपास सुरू, हल्ल्याचे कारण काय?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी पती दुर्वेश धाडवे आणि त्याचा मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे घडला? पतीच्या मनात सूडाचा भाव होता की यामागे काही वेगळं रहस्य दडलं आहे? पोलीस याचा तपास करत आहेत.

या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून, लोकांमध्ये अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. पतीच्या वागणुकीबद्दल आधीपासून काही शंका होती का? की अचानकच तो आक्रमक झाला? या हल्ल्यामागचं सत्य लवकरच समोर येईल


सम्बन्धित सामग्री