वसई: लोक आता शॉपमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीला प्रधान्य देताना दिसतात. त्यामुळे वेळेची बचत होते. तसेच कधीकधी पैशांची देखील बचत होत असते. ऑनलाईन अॅपद्वारे लोक खरेदी करत असतात. त्यातल्या त्यात लोक झेप्टोला सर्वाधिक पसंती देताना दिसतात. कारण झेप्टो पाच ते सहा मिनिटांमध्ये सेवा प्रदान करतो. काहीही मागवायचे असेल तर झेप्टो लगेत वस्तू घरपोच करतो. मात्र तुम्ही जर ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर सावधान... झेप्टोनं मागवलेल्या आईस्क्रीममध्ये अळ्या आढळल्या आहेत. नालासोपारा पश्चिमेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा: PM Kisan Yojana: छत्रपती संभाजीनगरमधील आठ हजार शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीपासून वंचित; नेमकं कारण काय?
झेप्टोद्वारे मागवलेल्या आईस्क्रीममध्ये अळ्या सापडल्याचे समोर आले आहे. नालासोपारा परिसरातून ही घटना समोर आली आहे. त्यामुळे ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर सावधानगिरी बाळगा. हल्ली लोक जास्त प्रमाणात ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असतात. मात्र जर खाद्यपदार्थांमध्ये अळ्या सापडत असतील तर या अॅपद्वारे लोकांची फसवणुक होत आहे, असं म्हणणे वावगे ठरणार नाही.