Sawan 2025: हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना संपूर्णतः भगवान शंकराला समर्पित असतो. या महिन्यात भक्त भगवान शिवाची उपासना करतात, उपवास करतात आणि सोमवारचं विशेष व्रतही पाळतात. श्रावण 2025 मध्ये 11 जुलैपासून सुरू होऊन 9 ऑगस्टला समाप्त होणार आहे. या काळात चार सोमवारी व्रते असतील 14 , 21, 28 जुलै आणि 4 ऑगस्ट.
श्रावण महिन्याचे धार्मिक, आध्यात्मिक व आयुर्वेदिक दृष्टीने देखील महत्त्व आहे. या महिन्यात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी विविध पूजा साहित्य वापरले जाते. भगवान शिवाच्या पूजेमध्ये खालील वस्तूंचा समावेश केला जातो:
पूजा साहित्य:
फुले, पंच मेवा, पंच फल, रत्न, चांदी/सोने, दक्षिणा, पूजा बत्तल, कुशासन, दही, शुद्ध देशी तूप, मध, गंगाजल, पवित्र जल, पंच रस, इत्र, गंध, रोली, मौली, जनेऊ, पंच मिष्टान्न, बेलपत्र, धोतरा, भांग, बेर, जांभूळ, आम्र मंजिरी, ज्वारीचे कणस, मंदार फुलं, तुलसी पानं, कच्चं दूध, ऊसाचा रस, कापूर, धूप, दीप, रुई, मलयागिरी, चंदन व शिव-पार्वतीच्या अलंकार व श्रृंगाराचे साहित्य.
शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी योग्य गोष्टी:
शुद्ध जल, दूध, साखर, केशर, दही, तूप, चंदन, मध, इत्र व भांग.
शिवलिंगावर अर्पण करू नये अशा गोष्टी:
शंखातून जल अर्पण करणे निषिद्ध आहे.
केवडा व केतकीचे फुल शिवलिंगावर चढवू नयेत.
तुलसीचे पान शिवपूजेसाठी वापरू नये.
भगवान शिवाला हळद किंवा नारळाचे पाणी अर्पण करणे वर्ज्य आहे.
पूजेची विधी:
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावं. घरातील मंदिरात दीप प्रज्वलित करावा. शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करावा. नंतर पवित्र जल, दूध, मध, तूप, बेलपत्र, फुले अर्पण करावीत. भगवान शंकराची आरती करावी व सात्विक भोग अर्पण करावा. या महिन्यात अधिकाधिक वेळ भगवान शिवाच्या ध्यानात घालावा.
श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करण्यामध्ये विशेष पुण्य प्राप्त होतं. उपवास करणारे भक्त दिवसभर फलाहार घेतात आणि संध्याकाळी शिवाची पूजा करून उपवास पूर्ण करतात. असे मानले जाते की श्रावणात भगवंतांची उपासना केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते व मनोकामना पूर्ण होते.