मुंबई: मनोज जरांगे पाटील आज सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर दाखल झाले. यावेळी जरांगेंसह हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले आहे.
मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषणाची घोषणा केली आहे. आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. कुणीही जाळपोळ आणि दगडफेक करू नये. पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची असे आवाहन जरांगेंनी कार्यकर्त्यांना केली आहे. पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची तर आरक्षण मिळवून द्यायची जबाबदारी माझी असे त्यांनी म्हटले. यावेळी आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची तूफान गर्दी पाहायला मिळाली.
हेही वाचा:BJP On MVA: तीन पक्षांचे राजकारण हाणून पाडा; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपाची मविआवर सडकून टीका
मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर मराठा कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. यावेळी मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन होणार, मी मरण पत्करायला तयार आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
जरांगेंच्या काय आहेत प्रमुख मागण्या ?
मराठा समाजाला कायद्यात बसणारे आरक्षण द्यावं. मराठा आणि कुणबी एक आहेत, याची अंमलबजावणी करावी. हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करावं. कुणबी नोंद सापडल्याने सगेसोयऱ्यांनाही पोटजात म्हणून कुणबी दाखले द्यावेत. मराठा आरक्षण आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावेत या प्रमुख मागण्या जरांगे यांनी केल्या आहेत.
जरांगेंची गेल्या 3 वर्षातील उपोषणं
•पहिलं उपोषण
कालावधी : 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023
ठिकाण : अंतरवाली सराटी
•दुसरं उपोषण
कालावधी : 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023
ठिकाण : अंतरवाली सराटी
•तिसरं उपोषण
कालावधी : 26 ते 27 जानेवारी 2024
ठिकाण : नवी मुंबई
•चौथं उपोषण
कालावधी : 10 ते 26 फेब्रुवारी 2024
ठिकाण : अंतरवाली सराटी
•पाचवं उपोषण
कालावधी : 4 ते 10 जून 2024
ठिकाण : अंतरवाली सराटी
•सहावं उपोषण
कालावधी : 20 ते 24 जुलै 2024
ठिकाण : अंतरवाली सराटी
•सातवं उपोषण
कालावधी : 25 ते 30 जानेवारी 2025
ठिकाण : अंतरवाली सराटी
•आठवं उपोषण
दिनांक : 29 ऑगस्ट 2025
ठिकाण : आझाद मैदान, मुंबई