Sunday, September 14, 2025 12:18:35 AM

Kolhapur News : 'मंदिराच्या मूळ रचनेचे नुकसान होता कामा नये', मंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश

शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मंदिर विकास आराखड्यातातील कामांबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत नगरविकास राज्यमंत्री आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी महत्त्वाचे आदेश दिले.

kolhapur news  मंदिराच्या मूळ रचनेचे नुकसान होता कामा नये मंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश

कोल्हापूर: शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मंदिर विकास आराखड्यातातील कामांबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत नगरविकास राज्यमंत्री आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी महत्त्वाचे आदेश दिले. मिसाळ म्हणाल्या की, 'करवीर निवासिनी अंबाबाई आणि जोतिबा मंदिर परिसराच्या विकास आणि आधुनिकीकरणाच्या कामात मंदिराच्या मूळ रचनेचे नुकसान होणार नाही, याची विशेष काळजी घेतली पाहिजे'. पुढे माधुरी मिसाळ म्हणाल्या की, 'आक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत निधी खर्च करण्यासाठी जिल्हा वार्षिक आराखडा तयार करावा'. 

माधुरी मिसाळ यांनी निर्देश दिले की, 'देवस्थान परिसराची शोभा वाढवताना पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या व्यपाऱ्यांचाही विचार करावा, तसेच, कोणावरही अन्याय होऊ नये. सोबतच, मंदिराच्या तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी फिल्टर सिस्टीम बसविण्यात यावे'. यादरम्यान, मंदिर परिसरातील भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची खात्री  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. सोबतच, 'मंदिर परिसरातील अतिक्रमणाची मोजणी करून लवकरच अतिक्रमणांना हटवण्याचे काम लवकरच सुरू होणार', असंही अमोल येडगे यांनी स्पष्ट केले. 

बैठक झाल्यानंतर, माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत, महानगरपालिका आणि सरकारी संस्था महाप्रीत (महात्मा फुले रिनिव्हेबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड) यांच्यात ऊर्जा संवर्धन, घनकचरा, शून्य कार्बन, पर्यावरणशी निगडित उपक्रम, मूलभूत सुविधा, नव आणि नवीकरणीय ऊर्जा यासह, आवश्यकतेनुसार प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाला. 

28 सप्टेंबर रोजी, जिल्हा प्रशासनाने 'नशामुक्ती रन – एक चाल – धाव नशामुक्त कोल्हापूरसाठी' या घोषणेखाली सकाळी 7 वाजता 'नशामुक्त रन'चे आयोजन करण्यात आले आहे. हा आदेश माधुरी मिसाळ यांनी प्रकाशित केला होता. 


सम्बन्धित सामग्री