Thursday, August 21, 2025 02:32:26 AM

'आम्हीच इथले भाई'; पुण्यात कोयता गॅंगचा हैदोस

कोयता गँगने पुन्हा एकदा पुण्यात हैदोस माजवला आहे. ही घटना पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी परिसरात घडली आहे, जिथे टोळक्याने कोयते उगारून दगडफेक केली.

आम्हीच इथले भाई पुण्यात कोयता गॅंगचा हैदोस

रोहन कदम, प्रतिनिधी, पुणे: कोयता गँगने पुन्हा एकदा पुण्यात हैदोस माजवला आहे. ही घटना पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी परिसरात घडली आहे, जिथे टोळक्याने कोयते उगारून दगडफेक केली. 'आम्ही इथले भाई', असं म्हणत कोयता गँगने परिसरात पुन्हा दहशत माजवली आहे. या दगडफेकीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

हेही वाचा: हिंजवडीतल्या हुंडाबळीचा महिला आयोगावर गंभीर आरोप

महेश विकास शिंदे (वय 20, रा. रामटेकडी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रेम उर्फ पिट्या थोरात (वय २१), दुर्वेश उर्फ बल्ल्या गायकवाड (वय: 18), अरविंद उर्फ नक्या माने (वय: 18), नितीन पाटोळे (वय: 18), ओंकार देढे (वय: 20), चेतन बावरी (वय: 19, सर्व रा. रामटेकडी, हडपसर) यांच्यासह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: राज्य सरकारनं मागवली 'लाडकी'च्या उत्पन्नाची माहिती

टोळक्याने केलेल्या दगडफेकीत नीलावती सतीश देडगे (वय: 50), अनिता विश्वजीत ठोसर (वय: 38) जखमी झाल्या आहेत. याबाबत संतोष छबुराव सुपेकर (वय 45, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी, 31 मे रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रामटेकडी परिसरात घडली होती.


सम्बन्धित सामग्री