Monday, September 08, 2025 02:44:22 PM

e-Pik Pahani registration : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! ई-पीक पाहणी नोंदणीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

शेतकरी आपल्या शेतातील पीकाची नोंदणी स्वत: करू शकणार आहेत.

e-pik pahani registration  शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी  ई-पीक पाहणी नोंदणीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महसूल विभागाने विकसित केलेल्या 'ई-पीक पाहाणी मोबाईल एप' च्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतातील पीकाची नोंदणी स्वत: करू शकणार आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विभागाच्या महसूल विभागाकडून सुरु केलेल्या या प्रकल्पाअंतर्गत यासाठी प्रत्येक हंगामासाठी दोन टप्प्यांमध्ये कालावधी निश्चित करण्यात आला आहे. १५ दिवसांचा एक म्हणजे ४५ दिवसांचे तीन कालखंड असणार आहेत. 

हेही वाचा - Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'चा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच होणार जमा 

पहिल्या टप्प्यात शेतकरी स्वत:ची नोंदणी करू शकतात. तसेच दुसऱ्या टप्प्यात उर्वरित खातेदारांची नोंदणी केली जाईल.   प्रत्येक हंगामासाठी असे तीन कालखंड असणार आहेत. 

हेही वाचा - Asia Cup 2025: भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशिया हॉकी कप 2025 जिंकून इतिहास रचला; अंतिम फेरीत कोरियाला 4-1 ने मात 

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दि. 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत स्वतः पीक पाहणी करण्याची संधी होती. तसेच १५ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबरदरम्याने शिल्लक खातेदारांची नोंद केली जाईल.दरम्याने रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी शेतकरी स्वतः नोंद करू शकतील. त्याचप्रमाणे दि. 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी सहायकांकडून नोंदणी होईल.  उन्हाळी हंगामासाठी 1 एप्रिल ते 15 मे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी कालावधी दिला असून 16 मे ते 29 जून हा सहायक स्तरावरचा टप्पा असेल.


सम्बन्धित सामग्री