Monday, September 08, 2025 04:23:36 PM

Gold Rate Today: सोन्याच्या भावात उलटफेर, ग्राहकांना मोठा दिलासा; तुमच्या शहरातील आजचे दर जाणून घ्या

भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सतत वाढत होते, मात्र आज सोमवार, 08 सप्टेंबर 2025 रोजी ग्राहकांना थोडा दिलासा मिळाल्याचं दिसून आल

gold rate today  सोन्याच्या भावात उलटफेर ग्राहकांना मोठा दिलासा तुमच्या शहरातील आजचे दर जाणून घ्या

Gold Rate Today: भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सतत वाढत होते, मात्र आज सोमवार, 08 सप्टेंबर 2025 रोजी ग्राहकांना थोडा दिलासा मिळाल्याचं दिसून आलं. सराफा बाजारात सोन्याच्या भावात किंचित घट झाली आहे, तर चांदीच्या दरातही बदल पाहायला मिळाला. जीएसटी परिषदेच्या 56व्या बैठकीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवत आहे.

आजचा देशातील सोन्याचा दर

आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹1,07,590 इतकी आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹98,624 नोंदवला गेला आहे. चांदीच्या बाबतीत 1 किलो चांदीचा दर ₹1,23,790 इतका असून 10 ग्रॅम चांदी ₹1,238 ला उपलब्ध आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे हे दर शहरागणिक बदलतात.

तुमच्या शहरातील आजचे दर

शहर                  

22 कॅरेट (10 ग्रॅम)                       

24 कॅरेट (10 ग्रॅम)                        

मुंबई

₹98,450

₹1,07,400

पुणे

₹98,450

₹1,07,400

नागपूर

₹98,450

₹1,07,400

नाशिक

₹98,450

₹1,07,400

 

हेही वाचा: UPI Payment Update: डिजिटल व्यवहारात मोठा बदल! NPCI ने जाहीर केले नवीन नियम; जाणून घ्या

22 कॅरेट विरुद्ध 24 कॅरेट सोनं

सोने खरेदी करताना कॅरेटचे महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे. 24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असतं. मात्र, त्याचे दागिने बनवणे शक्य नसल्याने दागिने प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्यात तयार केले जातात. 22 कॅरेट सोन्यात अंदाजे 91% शुद्ध सोने असते आणि उर्वरित 9% भाग तांबे, चांदी, जस्त यांसारख्या धातूंनी मिळून बनवला जातो. यामुळे दागिन्यांना मजबुती आणि टिकाव मिळतो.

बाजाराचा कल

तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील चढ-उतार, डॉलरची किंमत आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिती यावर सोन्याचे भाव अवलंबून असतात. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या झपाट्याने वाढीनंतर आज सोन्यात झालेला बदल हा ग्राहकांसाठी सुखद आहे. मात्र, येत्या काही दिवसांत दर पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या लग्नसराईचा हंगामही जवळ येत असल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांच्याही नजरा सराफा बाजाराकडे लागल्या आहेत.

 


सम्बन्धित सामग्री