मराठा आरक्षणा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी सरकार आपली अडवणूक करत असल्याचा आरोपदेखील जरांगे यांनी केला आहे. मात्र काहीही झालं तरीही मुंबई गाठायची असा पण जरांगे यांनी केला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात घोषणा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याआधी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना संबोधित केले. जरांगे यांनी मराठा समाज बांधवांना आवाहन करताना म्हटले की, सर्वांनी शांततेत मुंबईकडे जायचे आहे. समाजाची मान खाली होईल असे वागायचे नाही. सर्व डावांचा वापर करा, पण घाई करू नका. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानात उपोषण सुरू करणार. अशी लढाई जगाच्या पाठीवर झाली नसेल, कितीही दिवस लागले तर शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा.
हेही वाचा - Vasai Virar Building Collapse : वसई-विरारमध्ये इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
पुढे ते म्हणाले की, "देवदेवतांच्या नावावर अडवणूक केली जात आहे. त्रास दिला जात आहे. आम्ही हिंदू असून आमच्या सणाला आम्हाला रोखले जाते. सणासुदीला सरकारलाच अशांतता पसरवायची आहे. मोदी शहा साहेब तुमचे मुख्यमंत्री जाणून बुजून त्रास द्यायला बसविले आहे का?"
हेही वाचा - Lalbaughcha Raja 2025 : लालबागचा राजा मंडळाला बीएमसीची नोटीस ; 24 तासांचा अवधी अन्यथा...
सरकारला प्रश्न
नंतर ते म्हणाले की, "आम्ही दंगल घडवायला येत नाही. हिंदूंना अडविण्याचा हट्ट का? तुम्ही हिंदू विरोधी काम का करता याचा उत्तर आम्हाला लागेल. देवेंद्र फडणवीस आणि सरकार यांना चूक झाकवायची आहे. त्यांना सांगून चार महिने झाले. फोन करून दोन महिने झाले तेंव्हा तुम्हाला कळले नाही का?"