पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा बदलणार असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 23 जुलै रोजी पुणे ते कोल्हापूर या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे रहिवाशांना आणि प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान विभागाचा अंदाज
पुणे : गेल्या 24 तासात पावसाचा जोर कमी राहिला असून कमाल तापमान 28.9 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. आज घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.
सातारा : 0.3 मिमी पावसासह हलक्या सरींची नोंद झाली. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने घाटमाथ्यावरील भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : गेल्या 24 तासात 3 मिमी पावसाची नोंद झाली असून कमाल तापमान 26.3 अंश सेल्सिअस होते. आज घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: पीडित विजय घाडगेंचा सूरज चव्हाणांवर गंभीर आरोप; काय म्हणाले विजय घाडगे?
सोलापूर : मंगळवारी 8 मिमी पाऊस पडला आणि कमाल तापमान 31.9 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. आज हलक्या पावसाची शक्यता आहे.
सांगली : 8 मिमी पावसाची नोंद झाली, हलक्या सरींचा अंदाज आणि तापमान 22° सेल्सिअस ते 30° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
घाट भागात मुसळधार पाऊस सुरूच राहील, तर इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. शेतकरी आणि नागरिकांना त्यानुसार नियोजन करण्याचा सल्ला हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे.