Sunday, August 31, 2025 10:56:36 AM

Manoj Jarange Aandolan : आंतरवाली सराटी ते आझाद मैदान व्हाया जुन्नर; या मार्गांवरून जातोय जरांगेंचा मोर्चा

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.

manoj jarange aandolan  आंतरवाली सराटी ते आझाद मैदान व्हाया जुन्नर या मार्गांवरून जातोय जरांगेंचा मोर्चा

पुणे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे उद्या, 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. त्यासाठी मनोज जरांगे काल, 27 ऑगस्ट रोजी त्यांच्या आंतरवाली सराटे गावातील निघाले. त्यांनी आवाहन केल्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मराठा समाजाचे आंदोलकही विविध मार्गाने आझाद मैदान येथे शुक्रवारी पोहोचणार आहेत. दरम्यान, आज, 28 ऑगस्ट रोजी मनोज जरांगेंच्या प्रवासाचा दुसरा दिवस असून ते पुणे मार्गे मुंबईत दाखल होणार आहेत. पाहुया त्यांचा आंदोलनस्थळी जाणारा संपूर्ण मार्ग...

हेही वाचा : Eknath Shinde Meet Raj Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले राज ठाकरेंच्या गणरायाचे दर्शन

असा आहे मार्ग -

27 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथून सकाळी मोर्चाला सुरूवात 

शहागड फाटा ते साष्ट पिंपळगाव ते आपेगाव ते पैठण कमान मार्गे ते पांढरी पुल मार्गे ते मिरी नाका मार्गे ते शेवगाव ते घोटण ते अहिल्यानगर बायपास मार्ग ते नेप्त चौक मार्गे ते आळेफाटा मार्गे ते शिवनेरी किल्ला (जुन्नर येथे मुक्काम)

पुढे 28 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावर दर्शन येथून राजगुरुनगर खेड ते चाकण मार्गे ते तळेगाव मार्गे ते लोणावळा मार्गे ते पनवेल मार्गे ते वाशी मार्गे ते चेंबूर मार्गे मुंबईतील आझाद मैदान.


सम्बन्धित सामग्री