गोंदिया: गोंदिया तालुक्यातील ग्राम दासगाव बुज येथील मुलाने आईला खर्चासाठी पैसे मागितले आईने पैसे न दिल्याने मुलानेच गळा दाबून व डोके जमिनीवर आपटून आईची हत्या केली. प्रकरणी तिच्या 17 वर्षीय मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती सहारे आपल्या 17 वर्षीय मुलासोबत राहत होती. पतीच्या निधनानंतर गावातच नड्डे व अंडी विकून आपला उदरनिर्वाह करायची. भारतीला तिचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत होता. असेच पैसे मागण्यावरून गुरुवारी 26 जुलै च्या रात्री दोन्ही मायलेकांत वाद झाला. या वादात मुलाने भारतीचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले, यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला व मेंदूत रक्त गोठून तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा:उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयाला जागेचा पेच; अधिवेशनातच स्टाफ बेघर
भारतीच्या मृत्यूनंतर आरोपी मुलाने तिचा मृत्यू आजारपणाने झाला असल्याचे भासवून नातेवाईकांना फोन केला. आणि शुक्रवारी दि.27 जुलै ला तातडीने गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही करण्यात आले. नातेवाईकांची दिशाभूल करत मृत्यू संशयास्पद वाटल्याने तर रावणवाडी पोलिसांनी खड्ड्यात पुरलेले मृतदेह काढला व पुरलेल्या मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवण्यात आले शवविच्छेदनच्या अहवालात समोर आले की मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी दिला आहे. व्हिसेरा तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला.
शवविच्छेदन अहवालात मृत्यूस डोक्यातील रक्तस्राव कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी 17 वर्षीय विधी संघर्षीत मुलावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.