Monday, September 01, 2025 12:19:42 AM

अविनाश जाधवांच्या अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

मध्यरात्रीच्या सुमारास मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक केल्याप्रकरणी भिवंडीतील एका मनसे सैनिकाने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न मंगळवारी केला आहे.

अविनाश जाधवांच्या अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

भिवंडी: मराठीच्या मुद्द्यावरुन राज्याततील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच, मध्यरात्रीच्या सुमारास मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक केल्याप्रकरणी भिवंडीतील एका मनसे सैनिकाने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न मंगळवारी केला आहे. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडली असून या मनसे सैनिकाचे नाव सुशील अवटे आहे. या घटनेदरम्यान, निजामपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. जेव्हा, मनसे सैनिक सुशील अवटे यांनी स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ अटक केली. 

नेमकं प्रकरण काय?

एकीकडे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे, मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्यावर मारहाण झाल्यानंतर 'मनसे आणि परप्रांतीय' असा वाद पुन्हा समोर आला आहे. अशातच, मनसेचे अविनाश जाधव यांना मध्यरात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. '11 तासानंतर पोलिसांनी तुम्हाला सोडलं? काय झालं? गेल्या अकरा तासात काय घडलं?', असा प्रश्न अविनाश जाधव यांना विचारण्यात आला होता. यावर, मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, 'मी गेल्या 11 तासांत जे काही घडलं ते सांगेलच, पण मीरा भाईंदरमधील मराठी माणूस एकवटला, इथल्या आमदाराला त्यांनी दाखवून दिलं की मराठी टक्का कमी असला तरी एकवटला आहे'. 

हेही वाचा: झाडं तोडून तरण तलाव बांधला; मंत्री लोढांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

काय म्हणाले अविनाश जाधव?

'पोलिसांनी आम्हाला उचललं. आमच्या जवळ सुमारे दीड ते दोन हजार महाराष्ट्र सैनिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. खरंतर याची गरजच नव्हती. जर व्यापारी विना परवानगी मोर्चा काढू शकतात, तर आम्ही भूमिपुत्र आहोत. आम्ही महाराष्ट्रातील आहोत, मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे. मग आम्हाला मोर्चाची परवानगी द्यायला काय अडचण होती? पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की, या रुटने नको, त्या रुटने मोर्चा काढा. पण पोलीस माझ्याशी किंवा आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी असं बोललेच नाहीत, पोलीस चुकीची माहिती देत आहेत', असेही अविनाश जाधव यांनी सांगितले. 

'आमच्या मोर्चाला सरकारकडूनच विरोध होता. स्थानिक आमदार गृहखात्याच्या दबावाखाली आमचा मोर्चा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो यशस्वी झाला नाही. मराठी माणूस एकवटला आणि मोर्चा निघाला, मीरा भाईंदरमध्ये गेल्या 7-8 तास जे चाललं ते महाराष्ट्राने पाहिले, देशाने पाहिलं', अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली. 

पुढे, अविनाश जाधव म्हणाले की, 'सकाळी माझ्या घरी पोलीस आले. माझा पोलिसांना पहिला प्रश्न होता की, हा मोर्चा मराठी माणसांचा आहे. अधिवेशन चालू असताना तुम्ही मला घेऊन जाता, ह्या मोर्चाला विरोध करत आहात, मग हे सरकारच्या विरोधात जाईल असं तुम्हाला वाटत नाही का?. तेव्हा पोलीस अधिकारी म्हणतात की, ''माझ्यावर दबाव आहे''. पोलिसांनी सकाळी 3 वाजता मला घरातून उठवलं, तिथून मीरा भाईंदरला नेलं. मग तिथून मला खंडणीच्या ऑफिसमध्ये नेलं. त्यानंतर 2 तासांनी मला पालघरच्या टोकाला नेलं', अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली. 


सम्बन्धित सामग्री