नाशिक : गेल्या महिन्यात हिंदी भाषेवरून राज्यात गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. या मुद्द्याच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकाच व्यासपिठावर आले. पक्ष स्थापनेपासूनच मराठी माणसाचा, मराठी भाषेचा मुद्दा अग्रस्थानी ठेवणाऱ्या मनसेनं पुन्हा एका परप्रांतियाला चोप दिला आहे. मराठी माणसाचा अवमान करणाऱ्या त्या इसमाला मनसैनिकांनी खळखट्याक् भाषेत समज दिली. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने या भागातील एका गाडीला धडक दिली. धडक दिल्यानंतर या परप्रांतिय व्यक्तीने अरेरावी केली. यानंतर त्या मराठी माणसाने स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. मनसे पदाधिकाऱ्यांकडून परप्रांतीय इसमाला समज देत असतानाही त्याने त्यांनाही अरेरावी केली. मराठी बोलण्यास नकार देताच मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप दिला. 'मराठी लोगों की औकात क्या ?, तुम मराठी लोक भंगार हो', असे म्हणत त्या परप्रांतियानं मराठी माणसाला डिवचलं. मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतियाला बदडला