मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहिणींसाठी बारा हजार कोटी देण्याची विशेष घोषणा केली आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना भावाकडून ओवाळणी मिळाली आहे. पंतप्रधान उज्जवला योजनेसाठी मोदींनी ही विशेष घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टद्वारे मोठी माहिती दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी दिली आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी मोदींनी 12 कोटींच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे. 2025-26 साठी मोदींनी विशेष अनुदान जाहीर केले आहे.
हेही वाचा: Shravan Puja on Rakhi : आधी करा श्रावण पूजा, मगच बांधा राखी; काय आहे ही प्रथा, जाणून घ्या श्रावण पूजेचं महत्त्व
काय आहे फडणवीसांची पोस्ट?
राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडून लाडक्या बहिणींना खास भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत देशासह महाराष्ट्रातील कोट्यवधी लाडक्या बहिणींना भेट देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी (PMUY) 12,000 कोटींच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील 10.33 कोटी उज्ज्वला लाभार्थी कुटुंबांना अनुदानित दरात एलपीजी गॅस सिलिंडर मिळत राहतील. स्वयंपाकघर धूरमुक्त करून बहिणींचे आरोग्य सुरक्षित ठेवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार! अशा आशयाची पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
केंद्र सरकारने 1 मे 2016 रोजी पंतप्रधान उज्ज्वला योजनेची घोषणा केली. भारतातील गरीब कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने उज्ज्वला योना सुरु केली होती. या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले होते. त्यावेळी सरकारने गरीब कुटुंबातील महिला सदस्यांना मोफत गॅस (एलपीजी) कनेक्शन देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता नऊ वर्षाने 12 हजार कोटींच्या अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे.