पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खंडाळाजवळ असलेल्या दत्ता फूडमॉलसमोर शनिवारी एक विचित्र आणि मोठा अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे 18 ते 20 गाड्या एकमेकांवर आदळल्या. दरम्यान, या अपघातात अनेक गाड्यांचा चेंदामेंदा झाल्याचे दिसत आहे. यात, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा: 'रात्री शूटिंग अन् सकाळी सेटवर...'; संतप्त रुपाली भोसलेने शेअर केला अनुभव
नेमकं प्रकरण काय?
कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खंडाळाजवळ असलेल्या दत्ता फूडमॉलसमोर मोठा अपघात झाला. या दरम्यान, 18 ते 20 गाड्या एकमेकांवर आदळले. कंटेनरने भरधाव वेगात एका वाहनाला धडक दिली, ज्यामुळे एकाच वेळी अनेक वाहने एकमेकांवर आदळली. माहितीनुसार, या अपघातात तीन वाहने उद्ध्वस्त झाली आणि काही लोक जखमी झाले.
भारतातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ओळखले जाते. या महामार्गावर लाखोंच्या संख्येने वाहने धावतात. माहितीनुसार, शनिवारी आणि रविवारी गाड्यांची संख्या 2 लाखांहून अधिक असते. त्यामुळे, पोलिस वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करतात. नेहमीप्रमाणे, गर्दीचा आढावा घेऊन आजही पोलिसांनी नियोजन केले होते. मात्र, खंडाळ्याजवळ हा मोठा आणि अनपेक्षित आपघात झाल्याने संपूर्ण पोलिसांच्या नियोजनाचे 3/13 वाजले. या महामार्गावर सुमारे 5 किलोमीटर वाहनांच्या लांब रांगा लागल्या.