Thursday, September 04, 2025 07:44:46 PM

मुंडे तुम्ही राजीनाम्याची तयारी करा; दमानियांचा हल्लाबोल

पालकमंत्रीपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं.

मुंडे तुम्ही राजीनाम्याची तयारी करा दमानियांचा हल्लाबोल

मुंबई : पालकमंत्रीपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं. त्यालाही संतोष देशमुख हत्या प्रकरण हेच कारण होतं, हेही जगजाहीर आहे. आता या पालकमंत्री नाट्यानंतर अंजली दमानिया व मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. मुंडेंवर होत असलेल्या टिकेनंतर आपल्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा असे आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

धनंजय मुंडे यांच्या या विधानानंतर दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडेनी आता राजीनाम्याची तयारी करावी अशी मागणी केली आहे.

अंजली दमानिया यांची पोस्ट

धनंजय मुंडे तुम्ही बीडच्या मातीची बदनामी केलीय

संतोष देशमुखसारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने ही बदनामी झालीय

ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न होतोय

तुमच्याच पक्षातील लोक अधिवेशनात बीडबद्दल काय म्हणालेत पाहा

एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वांची बदनामी होतेय

पक्ष नेतृत्वाने पक्षाच्या हिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा

आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं पक्ष हिताचं नाही

आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरमधील जनआक्रोश मोर्चातून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

बीडचे राजकारण तेथील राखेभोवती गुंतलेलं आहे. बीड प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असला तरी या प्रकरणात उडालेला राखेचा धुरळा अद्याप खाली बसला नाही. विरोधकांनी हा मुद्दा तीव्रतेने लावून धरला असल्याने राष्ट्रवादीसाठी ही अडचणीची बाब ठरतेय.


सम्बन्धित सामग्री