मुंबई: नाशिकच्या देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. देवाभाऊ नावावरुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. त्या देवाभाऊंकडे सर्वकाही आहे तरी फोडाफोडी करतात. आमच्याकडे देवाभाऊ आलेत. तुम्हाला मात्र संघर्ष करावा लागेल.
नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी देवाभाऊ वाघमारे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि ठाकरे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव सारखे असल्याने उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्या देवाभाऊंकडे सर्वकाही आहे, तरी फोडाफोडी करतात. आता आमच्याकडे देवाभाऊ आलेत. तुम्हाला संघर्ष करावा लागेल असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: अजित पवार अदाणी, अंबानीपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा आरोप
मातोश्री येथे नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. नाशिकचे अपक्ष उमेदवार देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एक देवाभाऊ आहेत. त्यांच्याकडे सर्वकाही आहे. तरीही फोडाफोडी करतोय अशी जहरी टीका उद्धव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. सुरुवातीला मी आतमध्ये भेटलो. आतमध्ये बोलताना मी काहींना बोललो पण त्यांना कळलं नाही. आता बर झालं आमच्याकडे पण देवाभाऊ आहेत. पण दोघांमध्ये फरक आहे. एकिकडे सर्व काही आहे, तरी फोडाफोडी करतोय. हा आपल्याकडचा देवाभाऊ त्याला सांगितलं आहे. आपल्याकडे काही नाही लढावं लागेल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.