Wednesday, August 20, 2025 05:18:56 PM

'आता फक्त वडिलांचे नाव बदलणे बाकी आहे'; शहरांची नावे बदलण्याच्या मागणीवर इम्तियाज जलील यांचा महायुती सरकारवर निशाणा

सामाजिक न्याय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादचे नाव रत्नापूर आणि दौलताबादचे नाव देवगिरी करण्याची मागणी केली आहे, ज्याला भाजपचाही पाठिंबा आहे.

आता फक्त वडिलांचे नाव बदलणे बाकी आहे शहरांची नावे बदलण्याच्या मागणीवर इम्तियाज जलील यांचा महायुती सरकारवर निशाणा
Imtiaz Jaleel, Sanjay Shirsat
Edited Image

छत्रपती संभाजीनगर: राज्यात पुन्हा एकदा शहरांची नावे बदलण्याची मागणी निर्माण झाली आहे. तसेच यावरून राज्यातील राजकारण चांगलेचं तापले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा एक नवीन वाद समोर आला आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादचे नाव रत्नापूर आणि दौलताबादचे नाव देवगिरी करण्याची मागणी केली आहे, ज्याला भाजपचाही पाठिंबा आहे. परंतु मुस्लिम नेते आणि विरोधी पक्ष यावरून सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला करत आहेत. 

खुलताबाद शहराचे नाव बदलण्याची मागणी - 

शिंदे गट शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद हे ऐतिहासिक शहर, जिथे मुघल सम्राट औरंगजेबाची कबर आहे, ते बऱ्याच काळापासून वादाचे केंद्र आहे. आता या शहराचे नाव बदलून रत्नापूर करावे आणि जवळच्या दौलताबाद शहराचे नाव देवगिरी करावे. खुलताबादचे मूळ नाव रत्नापूर होते, जे औरंगजेबाच्या काळात बदलण्यात आले. त्याने धाराशिव आणि नगर सारख्या अनेक शहरांची नावे बदलली. महाराष्ट्रात जिथे जिथे दौलताबादसारख्या नावांमध्ये '-बाद' आहे तिथे त्यांची मूळ ओळख पुन्हा स्थापित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.'

हेही वाचा - नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार

दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार संजय केणेकर यांनी म्हटलं आहे की, 'मी संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना पत्र दिले असून महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे की, औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलून ते रत्नपुर करण्यात यावे. खुलताबाद शहराचे नाव रत्नपूर असून दौलताबादचे नाव देवगिरी आहे. हिंदू राजवट असताना ही नावे आधीच अस्तित्वात होती, जेव्हा मुघल आले तेव्हा त्यांनी नावे बदलली म्हणून पूर्वीची नावे द्यावीत, अशी मागणी संजय केणेकर यांनी केली आहे. 

हेही वाचा - घटस्फोटानंतर मुलाच्या Birth Certificate मधून पालकांचे नाव काढून टाकता येते का? मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? जाणून घ्या

आता फक्त वडिलांचे नाव बदलणे बाकी आहे - 

तथापी, विरोधकांनी महायुतीतील नेत्यांच्या या मागणीवर टीका केली आहे. एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महायुती सरकारवर फुटीरतावादी मुद्दे उपस्थित करून जाणूनबुजून अशांतता निर्माण करण्याचा आरोप केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना जलील यांनी म्हटलं की, 'जर तुमच्यात हिंमत असेल तर गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदला. आता फक्त वडिलांचे नाव बदलणे बाकी आहे, अशी खोचक टिप्पणी देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.  


सम्बन्धित सामग्री