Wednesday, August 20, 2025 05:23:44 PM

पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक

पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा मारला. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक

पुणे: पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा मारला. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी सुरु होती. 

पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा मारला. यात त्यांनी तीन महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे. पुण्यातील खराडी भागात हा प्रकार घडला आहे. 

हेही वाचा: राज्य सरकारकडे कंत्राटदाराची 79 हजार कोटींची थकबाकी; कंत्राटदार आता आंदोलन करणार?

पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन करण्यात आले. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्टीतून 3 महिला आणि 2 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारीमध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आली आहे. 

रेव्ह पार्टी म्हणजे काय? 

सामान्य पार्ट्यांपेक्षा रेव्ह पार्टी खूप वेगळी असते. या पार्टीत वेगवेगळ्या प्रकारची नशा केली जाते. गांजा, चरस, कोकेन, मेफेड्रोनसारख्या ड्रग्सचा वापर केला जातो. पार्टीत तरुण-तरुणी अनेक तास बेधुंद होऊन नाचत असतात. भारतात रेव्ह पार्टीला कायद्याने बंदी आहे. पार्टीच्या आयोजकांकडूनच ड्रग्ज उपलब्ध करुन दिलं जातं. रेव्ह पार्टी श्रीमंत घरातील तरुण-तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. रेव्ह पार्टीसाठी लाखांमध्ये पैसा खर्च केला जातो. 
 

 


सम्बन्धित सामग्री