Sunday, August 31, 2025 08:54:09 AM

मोहल्ला कमिटी बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी पुण्यातील धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटी बैठक घेण्यात आली. मात्र, काही वेळात अचानक दोन सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यात वाद झाला.

मोहल्ला कमिटी बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

रोहन कदम. प्रतिनिधी. पुणे: नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी पुण्यातील धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटी बैठक घेण्यात आली. मात्र, काही वेळात अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेना विभाग प्रमुख उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वादावादी झाली. दोन सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यात वाद झाल्याने हा चर्चेचा विषय बनल्याचे पाहायला मिळाले. 

हेही वाचा: पनवेलमध्ये फुटपाथवर सापडले नवजात अर्भक

नेमकं प्रकरण काय?

नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी पुण्यातील धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटी बैठक करण्यात आली. बैठकीदरम्यान स्थानिक पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि अनधिकृत बांधकामासंदर्भात चर्चा सुरू असताना पद्मावती परिसरातील एका सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्याने प्रश्न उपस्थित केला की, 'सोसायटीच्या बाजूला झोपडपट्टी असून अवैध धंदे चालतात ते बंद करण्यात यावेत'. याप्रकरणात जेव्हा शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांनी हस्तक्षेप केलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी बोलण्यास मज्जाव केला. काही काळानंतर जेव्हा उद्धव कांबळे यांना बोलण्याची संधी मिळाली तेंव्हा, 'ही जागा जगताप यांचीच होती', अशा प्रकारचा युक्तिवाद उद्धव कांबळेंनी केला. त्यानंतर हा वाद उफाळला आणि शाब्दिक चकमक उडाली.


सम्बन्धित सामग्री